खूप दिवसात काही लिहिलं नाही, लिहावं असं काही घडलचं नाही
कुणी गालातल्या गालात हसलं नाही, कि धाय मोकलून रडलं नाही
सगळं कसं शांत आहे, कळत नाही कि वादळ मागे आहे कि पुढे आहे
आभाळ आणि मन दोन्ही भरून आलय, पाउस काही पडणार याची मात्र खबर नाही
हरवलं काहीच नाहीये, पण सगळेच काहीतरी शोधतायत
ऐकत कुणीच नाहीये, पण सगळेच काहीतरी बोलतायत
एवढ्या सगळ्या धावपळीत भावना कुठे तरी कोमेजतायत
गर्दी वाढलीये, पण माणस कुठेतरी हरवतायत!!
सुरेंद्र
मे २०१२