फेसबुक आणि मैत्री / Facebook and Friendship

A marathi poem about how a friendship moves from a non-FB to the FB era

 

तो म्हणाला कि बरेच दिवसात दिसला नाहीस ,                                                              मी म्हटलं अरे मी इथे इतका दूर दिसणार कसा?
तो म्हणाला अरे तसं नाही रे , बरेच दिवस FB वर नाही दिसलास

मी म्हटलं FB वर दिसतात ते फ़क़्त status रे .. तू आणि मी तिथे कधीच नसतो
कितीही chat केला तरी संवाद त्यात कुठे घडतो?
photos upload होतात रे पण आठवणी download होत नाहीत
Friends लिस्ट मध्ये असलेली माणसं नेहेमीच मनात घर करून राहत नाहीत

तो म्हणाला अरे असं कसं म्हणतोस, इतक्या वर्षांच्या मैत्रीला friend list मध्ये कुठे शोधतोस?
अरे नाका सुटला असेल आपला पण skype अजून फ्री आहे
तुझी मारायला मी तिथे नसेल, पण तुझ्या FB wall वर comments माझ्याच आहेत.

सांग बरं chat वर आपण असं वेगळं काय बोलतो?                                                       काय ते फक्त मराठी शिव्या english मध्ये देतो 🙂
माझा काही लोचा झाला तर अजूनही मला number तुझाच आठवतो                             आणि आज हि माझ्या bday ला पहिला phone तुझाच येतो,

आपण दोघे एकाच गावात नसलो म्हणून दुखी: नको होवू मीत्रा,                                  मनानी आपण जवळ आहोत
उद्या FB ची सगळी friend ‘s list नसली तरी बेहत्तर ,                                                 आपण दोघे एकमेकांसाठी कायमचे आहोत 🙂

सुरेंद्र फाटक
Aug २०१२