I am a man of too many words..
मी नेहेमीच फार बोलतो, मनातल्या दुखा;ला झाकायला शब्दांची चादर शोधतो
I am a man of history…
मी नेहेमी इतिहासातच जगतो, इतरांच्या भूतकाळात नेहेमी स्वताच्या वर्तमानाला बघतो
I am a man of mystery..
मी कायमच गूढ बनून राहतो, आयुष्याचं कोडं सोडवताना स्वतःच हरवत असतो
I am a man of hurt…
मी नेहेमीच जखमा जपत असतो, नवीन खपल्या येण्यासाठी जुन्या पुन्हा पुन्हा उकरत असतो
After all I am just a human..
माणूसच आहे मी , काही सुचेनासं झालं कि उगाचंच अश्या कविता लिहितो
Surendra Phatak
Feb 2004