An effort to document the reasons where people find inspirations to write poems.
कविता म्हणजे सोप्या भावना कठीण शद्बात व्यक्त करणं आणि जुळत नसलं तरी यमक जुळवत रहाणं
कविता म्हणजे शब्दांच्या गर्दीत भावना लपवणं आणि सांगता येत नसेल तर सांगायचा प्रयत्न करत रहाणं
कविता म्हणजे सत्य कळत असेल तरी स्वप्नातच जगण्याचा हव्यास आणि कविता म्हणजे चौखूर उधळणाऱ्या मनाला हळुवार घातलेला लगाम
कविता म्हणजे तू नसताना असल्याची जाणीव आणि कधी कधी तू असतानाही जाणवलेली तुझी उणीव
कविता म्हणजे एक भास आणि कधी कधी मनाला झालेला त्रास कविता म्हणजे एक व्यंग आणि कधी कधी मनात उठलेले तरंग
कविता म्हणजे प्रेम आणि कधी कधी चुकलेला नेम कविता म्हणेज रंगलेला डाव आणि कधी कधी विस्कटलेला गेम
कविता म्हणजे आपण दोघे आणि कधी कधी फ़क़्त मी कविता म्हणजे बहरलेलं झाड आणि कधी सुकून गेलेली बी
कविता म्हणेज मनानी घेतलेला झोका आणि कधी कधी हुर्दयाचा चुकलेला ठोका खरच सांगतो तुला कविता म्हणजे मनाला लागलेली एक आस आणि कधी कधी फ़क़्त timepass
Surendra ( June 2012)