कधी विचार केलाय कि सूर्याच्या घरात अंधार झाला तर दिवा कोण लावेल
आणि आभाळाचे कपडे फाटले तर ठिगळ कुठून येयील?
आयुष्यात आपण सूर्यच शोधात असतो ,
पण त्याच्याही घरात अंधार असू शकतो हा विचार आपल्या गावी हि नसतो..
आपल्याला झाकणार्या आभाळाला हि निवारा लागतो हे आपल्याला कळत नसतं
आणि त्या आभाळाला ते माहित असूनही ते आपल्या ला सांगत नसतं..
सूर्याच्या घरात उजेड करायला सूर्य बनायची गरज नसते पण काजवा बनायचीहि आपली दानात नसते आणि आभाळाची आबाळ कायमच आपल्या कडून होत असते !!!
सुरेंद्र फाटक
फेब्रुवारी २००४